शाखा इतिहास





बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जो ज्ञान यज्ञ मांडला तो मानवी समाजाला नव संजीवनी देणारा ठरला .

                                   नगर जिल्ह्यात कोल्हार या गावी श्री कोल्हाळेश्वराच्या छायेत जून १९५८ मध्ये कै.रंगनाथ भगवंत खर्डे (छटाक बाबा ) व त्यांचे समकालीन ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार या शाळेची स्थापना झाली . 
                                   
                                     सुमारे २६ वर्षापूवी मा.कै.शंकरनाना खर्डे पा. यांच्या सहकार्याने व कै.छटाक बाबा यांचे नेतृत्व व इतर शिक्षण प्रेमी ग्रामस्थ तसेच प्रवरा सहकारी उस उत्पादक व सर्व सभासद निधीतून सन १९७३ साली विद्यालयाची पहिली इमारत उभी राहिली.




                                               सन-१९८३ पासून विद्यालयात तांत्रिक विभाग सुरु झाला या विद्यालयात विविध स्पर्धा परीक्षा , क्रीडा , कला या क्षेत्रात मार्गदर्शन केले जाते .



                                     सन-२०१०-११ या साली विद्यालयात चार खोल्यांची नवीन वास्तू बांधण्यात आली .

या शाळेत अद्यावत अशा  प्रशस्त संगणक कक्ष आहे.


शाखेत सन २०१८/१९ या शैक्षणिक वर्षात एकूण १४०५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
माध्यमिक विद्यार्थी संख्या -१३४५
उच्च माध्यमिक विद्यार्थी संख्या -५५
    विद्यालयात ५ वी ते १० वी पर्यंत गुरुकुल वर्ग चालू आहेत गुरुकुल मध्ये साधरण ३०० च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत
    मागील वर्षी म्हणजे सन २०१७/१८ या शैक्षणिक वर्षात विद्यालयातील एकूण ४८ विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत शिष्यवृत्ती धारक झाले आहेत.
५ वी शिष्यवृत्ती -१०
५ वी नवोदय – ३
५ वी ते ८ वी मंथन – ४
७ वी आर.टी.एस – १०
८ वी शिष्यवृत्ती – ११
८ वी एन.एम.एम.एस – ३
८ वी एम.टी.एस – ८
    या स्पर्धा परीक्षांपैकी आर.टी.एस मध्ये विद्यालयाचा उत्तर विभागात प्रथम क्रमांक आला.

    मागील वर्षी १० वी चा निकाल 87.30%  लागला. व बारावीचा निकाल 87.50%  लागला.